आज ९ नोव्हेंबर २००९ महाराष्ट्राच्या इतिहासतील काळा दिवस म्हणून नोंद होईल. महाराष्ट्राच्या विधानसभेत आज मराठी माणसाची, मराठी भाषेची आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लत्तरे टांगली गेली. “या साठीच का केला होता स्वराज्याचा अटहास“? कोण, कुठला अबू आझमी, आपल्याच घरात येऊन, आपल्यालाच आवाहन देतो आहे. संविधानाच्या आड लपून हा आपल्याला हिणवत आहे.

ज्याला निवेदनाची भाषा कळत नसेल तर करावे तरी काय? हा माझा प्रश्न आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांनी लढलेल्या एकतर्फी युद्धाचे निषेध करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला. हात जोडून विनंती कळत नसेल तर तोच हात त्याच्या श्रीमुखात देण्याची हिम्मत मराठी माणसात आहे, हे आज प्रत्येक महाराष्ट्र द्रोही माणसाला चांगलेच कळले असेल.

लाज आणि चीड या गोष्टीची वाटते की मराठी माणसाच्या आणि मराठी स्वाभिमानाच्या गमज्या मारणाऱ्या शिवसेनेने का समर्थन नाही केले आज मनसेच्या आमदारांचे? एका प्रसंगाची आठवण करून देतो, राष्ट्रपती पदासाठी जेव्हा कॉंग्रेसच्या प्रतिभा पाटील यांचे नाव पुढे आले, तेव्हा भाजपा चा विरोध डावलून माननीय बाळासाहेबांनी प्रतिभा पाटील यांना समर्थन दिलं होत, का? फक्त त्या महाराष्ट्राच्या म्हणूनच ना? तर आज काय शिवसेना झोपली होती?

मराठी मतं फक्त सत्तेसाठी का? शंका येत होती शिवसेनेच्या धोरणांवर, आज मात्र शंके वर शिकामोर्तब झालं. आज महाराष्ट्रा बद्दल कळवळा असलेलं प्रत्येक मराठी मन रडत असेल. आज परीक्षा होती शिवसेनेची आणि निकाल काय हे सर्व जाणतात. अहिंसेची भाषा कमीतकमी शिवसेनेनी तरी करू नये. आत्ता शिवसेना कोणाची आणि कोणाचा रिमोट? हा प्रश्न नाही विचारला तरच नवल.

भारतीय जनता पक्षा कडून तर काही अपेक्षाच उरल्या नाही आहेत. ते गृह्क्लेशात संपणार हेच खरे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांनी तर कधीच महाराष्ट्र विकायला काढला आहे. “कॉंग्रेस चे एकाच धोरण, सत्तेसाठी राजकारण..” हेच खरे. यांना घडल्या प्रकाराबद्दल काहीच घेणे-देणे नाही असं म्हणलं तर काहीच चूक ठरणार नाही. यांना आता चिंता असेल ती मिळालेल्या खात्यांची, पुढच्या पाच वर्षात कसे-कसे आणि कुठून-कुठून महाराष्ट्राला पोखर्ता यईल याची. बाकी भोंदू बाबाची सेवा अखंड रित्या सुरू आहेच.

आता उरले “सत्याची” बाजू मांडणारे पत्रकार बांधव… माझ्या भाषेत “बघे”. यांना फक्त “ब्रेंकिंग न्यूस” पाहिजे, TRP कशी वाढणार हीच चिंता. यांना लढणं माहित नाही, यांना प्रतिकार माहित नाही, यांना योग्य- अयोग्य काय याच्याशी घेणे नाही, फक्त मोठ्या बाता. हि अहिंसा आहे, हे संविधानाला अनुसरून नाही, हे सगळं मांडण्यात हे बेजार. ब्रष्ट नेते येतात आणि आपलं काम करून जातात, पत्रकार मंडळी फक्त प्रश्न विचारतात, उत्तरे ऐकतात, तेच जोडून- तोडून छापतात आणि म्हणतात “आता वळूया पुढच्या बातमी कडे”. ते तरी बिचारे काय करणार, सगळे वृतपत्र आणि वाहिन्या कोणच्या तर बड्या- बड्या नेत्यांच्या.

उरली जनता, त्यांना कोण विचारणार. मतदान झाले आता आपल्याला कोणी विचारत नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. मग बातमी या कानांनी ऐकाची, थोडे शिव्या- शाप द्यायचे आणि दुसऱ्या कानांनी सोडून द्यायचे. पुन्हा पुढच्या निवडणुकीत तीच चूक करायची आणि मग बसायच बोंबलत.

अभिमान याच गोष्टीचा की, कमीतकमी महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक प्रचारात हाती घेतलेल्या मुद्यांना सभागृहात मांडते आणि त्या साठी कोणच्याही कारवाईची भीती ना बाळगता लढते. तरीही ज्यांना वाटते की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सभागृहाचा अपमान केला आहे, त्यांना मी सल्ला देतो की, विरोधी पक्ष म्हणून गप्प बसणारा आमचा पक्ष नाही. आमचा इमान हा मराठी जनतेशी आणि त्याच्या विकासाशी. बाकी सर्व गोष्टी या शुल्लक. मी कधीही हिंसेचा समर्थक नसणार, पण जर कोणी महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालेल, तर त्याला आम्ही सोडणार नाही. त्याला समजणाऱ्या भाषेत आम्ही त्याला उत्तर देऊ. माननीय शिशिर शिंदे, रमेश वांजळे, राम कदम आणि वसंत गीते यांचा आम्हाला अभिमान आहे.

मनसेचे १३ आमदार होते, चार निलंबित झाले, उरले ९. पण आता आम्हाला खात्री आहे की, हे नऊ नक्कीच सरकारला पुरून उरतील आणि महाराष्ट्राच्या नेत्यान समोर एक नवा आदर्श मांडतील.

– जय महाराष्ट्र.

Advertisements