वरील क्लिप तुम्ही पाहिली असेलच. अनुराग कश्यप च्या विचित्र विधानाचा मी निषेध करतो. याची  “DEV D” ची अजून उतरलीच नाही आहे, अजून हा नशेत आहे हेच वाटतंय.

मूळ मुद्दा काय? तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने “शांतपणे” केलेल्या आंदोलना मुळे “Antichrist” या चित्रपटाचा प्रयोग बंद पडला. चित्रपट अशलील आहे का? या बाबत जर तुम्हाला माहिती हवी असेल तर http://www.imdb.com/title/tt0870984/parentalguide हे पान बघा. सरळ स्पष्ट उत्तर आहे कि, हो चित्रपट तर अशलील आहेच. तर मग आंदोलन केलं तर काय चुकलं.

म्हणजे या स्वघोषित पुरोगामी विचारांच्या लोकांनी बंद दरवाजात काहीही पाहिलं तर चालतं. यांच्या अशलील्तेवर आम्ही बोट ठेवलं तर आम्हीच अशलील असा प्रचार करतात.

आता यांना पाठीशी कोण घालणार तर, आपले हिंदी भाषिक वृतवाहिनी वाले. यांची भाषा तर बघा “..मुंबई में महाराष्ट्र नवनिर्माण सेना की डराने, धमकाने और हंगामे की राजनीती फिर शुरू हो गयी है…” असा अपप्रचार केल्यावर कोणाचं रक्त नाही खवळणार. खरं- खोटं, चूक- बरोबर काही बघायच नाही, मनसे जे काही करेल ते चूकच, हा एकच न्याय.

अनुराग कश्यप याने विनाकारण राज साहेबांवर वयक्तिक टीका केली आहे. यासाठी त्याला जाहीर माफी तर मागावीच लागेल. आत्ताच जर हे ठेचलं नाही तर, उद्या उठसुठ कोणी ऐरागैरा तोंडसुख घेईल. आत्ता पर्यंत मनसे ने आत्मसात केलेला शांततेचा पवित्र कौतुकास्पद आहे, पण या कश्यप सारख्यांना हि भाषा कळेल असे वाटत नाही.

प्रत्येकाला हा संदेश गेला पाहिजे कि, या महाराष्ट्रात फक्त मराठी माणसाचाच आवाज चालतो.मुंबई आणि महाराष्ट्र जर कोणाच्या बापाचा असेल तर तो आमच्याच.

– जय महाराष्ट्र!
Advertisements