अप्रतिम व्हिडियो!!! काय वाटलं हा व्हिडियो बघताना? आणि हो व्हिडियो “हिंदीत” आहे. समाजातल्या काही नाकर्त्या लोकामुळे झालेली ही अवस्था. ही परिस्थिती पाहून राग आणि चीड जर येत नसेल तर त्यांना मी तरी संत, महापुरुष अथवा “राजकारणीच” म्हणेन (याचा अर्थ असा मुळीच होत नाही की राजकर्ते आणि संत- महापुर्ष सारखे). सत्ता उपभोगुन उन्मत्त झालेले हे लोकं, गेंड्याच्या कातडीचे, “देशद्रोही” आहे. यांना आपल्या समाजा विषयी, भाषे विषयी, देशा विषयी काहीच कस वाटत नसेल.

“प्रिंटींग” मध्ये चुका होताच कश्या आणि ते पण जाहीरनाम्यात, हा तर जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे. माझे मत असे आहे की प्रत्येक राजकीय पक्षाने जाहीरनाम्यात केलेले आश्वासनं जर १००% पूर्ण केली नाही, तर त्या पक्षाने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि जनतेला हा अधिकार पाहिजे की त्या पक्षाला कोर्टात खेचता आलं पाहिजे. असा कायदा केला पाहिजे. ज्यांना हे मंजूर असेल त्यांनी निवडणुका लढवाव्या, नसेल जमत तर खुशाल घरी बसून राहावे. असे असल्या पेक्षा नसलेले बरे.

हे भ्रष्ट नेते निवडणुका आल्या की जाहीरनामे काय, वचननामे काय, पदयात्रा काय सगळ्या थापा!. हा व्हिडियो पाहून जर मी काही शिकलो असेल तर ते आहे की, जो पर्यंत आपण ” सामान्य माणूस/नागरिक” जागरूक राहत नाही, सवतः साठी लढत नाही तो पर्यंत आपण “रडतच” बसणार. सिस्टम बदलायची असेल तर आधी आपण सगळ्यांनी डोळे उगधून सत्यला सामोरे गेले पाहिजे, खर्या परिस्थितीचा अभ्यास केला पाहिजे. “मतदान” केले पाहिजे.

– जय महाराष्ट्र!


Advertisements